गोध्रा प्रकरणी मे महिन्यात सुनावणी   

नवी दिल्ली : गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या गोध्रा रेल्वे जळीतकांड प्रकरणात गुजरात सरकार आणि इतर दोषींनी दाखल केलेल्या सात अर्जांवर सर्वोच्च न्यायालय ६ आणि ७ मे रोजी अंतिम सुनावणीस घेणार आहे. न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती राजेश बिंदल यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
 
दोषींपैकी एकाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांना खंडपीठाने, दोषींवरील आरोप, कनिष्ट न्यायालयांचे निष्कर्ष आणि रेकॉर्डवरील युक्तिवाद ३ मे पर्यंत दाखल करण्यास सांगितले आहे. या प्रकरणावर आम्ही ६ आणि ७ मे रोजी अंतिम सुनावणी घेऊ. या दिवशी अन्य कोणत्याही प्रकरणांवर सुनावणी होणार नाही, असेही खंडपीठाने म्हटले आहे. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातमधील गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसचा एस-६ हा डबा जाळण्यात आला होता. 

Related Articles